दिंडोरी – कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी नागरीकांनी व विद्यार्थांनी योग्य वेळी लसीकरण करुन घेवुन त्यासंबधीचे सर्व नियम पाळणे हाच उत्तम आणि सुरक्षित पर्याय सद्यस्थितीत आहे म्हणून शासनाच्या आदेशानुसार स्वयंस्फूर्तीने आपण स्वत:ला सुरक्षित ठेवावे असे आवाहन कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.
कादवा सहकारी साखर कारखाना व जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा यांच्या सयुक्त विद्यमाने प्राथमिक विद्यामंदिर राजारामनगर येथे भव्य कोरोना प्रतिबंधात्म्क लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कादवा कारखाना सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे ,संचालक शिवाजीराव बस्ते, बाळासाहेब जाधव, बापूसाहेब पडोळ, साहेबराव पाटील, रामदास पिंगळ, मधुकर गटकळ,त्रंबकराव संधान, बाळासाहेब देशमुख ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे . वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक डौले, डॉ. हिवाळे डॉ. महेश पाटिल , डॉ. शुभम शिदे ,डॉ. स्नेहल मोरे ,डॉ.वैशाली सोनवणे, विशाल हिंगोळे, डॉ. चेतन जाधव, डॉ. अमोल राठोड, परिचारीका सौ. कविता सोनवणे ,मिनाबाई आहिरे पर्यवेक्षक श्री जोशी , जमधडे व त्यांचे सर्व वैद्यकीय पथक कारखाना वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप तिडके आदी उपस्थित होते.
.बी.के.कावळे विद्यालयाचे प्राचार्य बी.के.शेवाळे यांनी उपस्थित सर्वांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. सूत्रसंचालन प्राथमिक विद्यामंदिर राजारामनगर शाळेचे मुख्याध्यापक अशोक शिंदे यांनी केले. तर आभार पर्यवेक्षिका श्रीमती व्ही.आर.जाधव व बाळासाहेब वडजे यांनी केले. या शिबिरात एकाच दिवसात ५७६ इतक्या व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कादवा कारखाना संचालक मंडळ,कर्मचारी,बी.के. कावळे विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा शिक्षक शिक्षिका कर्मचारी,वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.