दिंडोरी – नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न, दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक कार्यकारिणीची निवड नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंतराव पवार , निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा सरचिटणीस रमेश देसले, दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार यांच्या प्रमुख उपस्थितीत जानोरी येथील ग्रामपालिका कार्यालयात बिनविरोध संपन्न झाली.
निवडणूक कार्यक्रमाप्रसंगी सर्व पदासाठी एक एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रमेश देसले यांनी बिनविरोध निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीची घोषणा केली.त्यात अध्यक्ष पदी भगवान गायकवाड, कार्यध्यक्षपदी महेश ठुबे उपाध्यक्ष अशोक निकम, समाधान पाटील सरचिटणीस दिगंबर पाटोळे , खजिनदार नारायण राजगुरू, समन्वयक सुनिल घुमरे, संघटक विनोद गायकवाड, सहसरचिटणीस सागर मोर, सहखजिनदार खंडेराव डोखळे, सहसंघटक बाळासाहेब अस्वले, प्रसिद्दी प्रमुख श्रीराम देवकर, कार्यकारिणी सदस्य- संजय कड, संजय थेटे, खंडेराव बोराडे, बंडू महाराज खंडांगळे, आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार यांनी मान्यवरांचे स्वागत करून गेल्या सहा वर्षात तालुका पत्रकार संघाने राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली.संस्थापक जिल्हा अध्यक्ष यशवंतराव पवार यांनी जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याची माहिती सांगून मागील काळात दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाने उत्कृष्ठ केलेल्या कामकाजाबद्दल कौतूक केले.
या निवडीप्रसंगी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विलास ढाकणे, नितीन गांगुर्डे, सुखदेव खुर्दळ, अनिल गांगुर्डे, संदीप मोगल, अशोक केंग, दुर्गेश दायमा, विलास जमदाडे, गोरख जोपळे, किशोर जाधव, रमाकांत शार्दूल, अरुण बैरागी, राजेंद्र जाधव, शांताराम पगार, शामराव महाराज सोनवणे, रविंद्र तुंगार, नामदेव पैठणे, किशोर बोरा, योगेश मेधने, सचिन बसते, निलेश मौले, किरण पैठणे, केशव चित्ते, हेमंत पवार, संतोष चारोस्कर, शुभम बोडके, किशोर क्षीरसागर, रितेश पारख, जयसिंग राजपुरोहित, आदींसह सभासद उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणीची मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.जानोरी येथील जेष्ठ पत्रकार सुनिल घुमरे, अशोक केंग ,समाधान पाटील यांनी मिटिंगचे नियोजन केले.सुत्रसंचलन संस्थापक अध्यक्ष संतोष कथार यांनी तर आभार सरचिटणीस दिगंबर पाटोळे यांनी मानले.