दिंडोरी -मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या वतीने रविवार दि. 28 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवनिका संस्थानचे सरचिटणीस नामाकर्ण आवारे यांनी दिली.ब्रम्हाडशास्त्र तज्ज्ञ कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब सामान्य जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हाडांचे आजार, सांधेदुखी, मणक्याचे विकार, गुडघे दुखी, अस्थिरोग्य तपासणी, हदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, मेंदुचे आजार, श्वसनाचे आजार, अस्थमा तपासणी, कानाचे, नाकाचे व घश्याचे आजार तपासणी, पोटाचे आजार, पोटदुखी, अल्सर, अॅसिडिटी, मुळव्याध, हर्निया, कॅन्सर, मुतखडा व मुत्रपिंडाचे विकार तपासणी, स्त्रियांचे आजार, दातांचे विकार आदी आजारावर तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात डॉ. नंदकिशोर कातोरे, डॉ. निरज पाटील, डॉ. अभय सोनवणे, डॉ. सुशिल अंतुर्लिकर, डॉ. दिपक गडाख, डॉ. रमेश घाडगे, डॉ. रिटा पाटील, डॉ. अमोल भालेकर, डॉ. संगीता कातोरे, डॉ. संदीप गुंजाळ आदी तज्ञ उपचार करणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यांवा, असे आवाहन ब्रम्हांडशास्त्र तज्ञ अशोककुमार खरात, उपाध्यक्ष राजेंद्र घुमरे, सरचिटणीस नामाकर्ण आवारे, सदस्या तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सदस्य ललित पोफळे, सुभाष गमे, नितीन गांगुर्डे आदींनी केले आहे.