दिंडोरी – तालुक्यातील वणी येथे बसस्थानक परिसरात महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेदरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत संशयित आरोपींना अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मित्रासमवेत बुधवारी रात्री वणी बसस्थानक परिसरात आली होती. त्या ठिकाणी आलेल्या चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर चौघे पळून गेले. वणी पोलिसांना समजताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी काही तासात संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास सुरू आहे.