दिंडोरी – अडचणीत असलेल्या कादवा कारखान्याच्या सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ करत श्रीराम शेटे यांचे नेतृत्वाखाली संचालक मंडळाने गाळप क्षमता दुप्पट करत आता काळाची पावले ओळखत इथेनॉल प्रकल्प हाती घेतला असून कोणतेही बायोप्रोडक्ट नसतानाही उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी असलेला व वेळेत एफआरपी अदा करणारा कादवा राज्यात अग्रेसर असून कादवाची यशस्वी वाटचाल राज्यातील सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत आहे असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४५ वा गळीत हंगाम शुभारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला त्यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार देविदास पिंगळे,आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार,आमदार सरोज अहिरे,माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल,माजी आमदार शांताराम आहेर,जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटिल बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील,माजी जिप अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,राजाभाऊ डोखळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याची गाळप क्षमता ही जास्तच हवी त्यादृष्टीने कादवाने गाळप क्षमता वाढविली हे योग्य केलेच असून अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच साखरे सोबत इतर उपपदार्थ निर्मिती करणे गरजेचे असून इथेनॉल हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारने त्यासाठी सवलती जाहीर करत प्रोत्साहन दिले आहे. यंदा राज्यात १० लाख मेंटन इथेनॉल बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ब्राझील मधील दुष्काळ व इथेनॉल निर्मिती यामुळे साखर उद्योग पुढील दोन वर्षात अडचणीतून बाहेर पडेल असे सांगत शेतकऱ्यांनी जास्त ऊस लावावा असे सांगितले. कादवाला इथेनॉल प्रकल्पासाठी सभासद ठेवी देत आहे. यावरून सभासदांचा या संचालक मंडळावरील विश्वास दिसून येत असून कादवा पॅटर्न हा राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला दिशादर्शक ठरणार आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक संकटात असून ती बाहेर काढण्याचे प्रयत्न सरकारचे आहेच. पण, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले. प्रास्ताविक करताना चेअरमन श्रीराम शेटे यांनी कादवा ची वाटचाल विशद करत कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढत टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करत गाळप क्षमता दुप्पट केली आहे. तर इथेनॉल प्रकल्प हाती घेतला असून सीएनजी प्रकल्प बाबत विचारविनिमय सुरू आहे. इथेनॉल प्रकल्पासाठी सभासद ठेवी देत असून अजूनही ठेवी द्याव्या असे आवाहन करत यावर्षी उसतोडीचे योग्य नियोजन करत विक्रमी गाळप सर्वांच्या सहकार्याने करणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कादवा कारखान्याच्या आदर्शवत कारभाराचा राज्यभर नावलौकिक वाढत असून कारखान्याचे इथेनॉल प्रकल्प व इतर कोणत्याही सहकार्यासाठी आम्ही व शासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले. तसेच मागील शासन काळ व गेली दोन वर्षे कोरोना काळ यामुळे विकासनिधी न मिळाल्याने रस्ते आदीं प्रश्न गंभीर बनले आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून सदर विकासाचा पूर्ण बॅकलॉग भरून काढू असे झिरवाळ यांनी सांगितले.प्रारंभी सोमनाथ मुळाने,सुरेश कोंड, चिंतामण मोरे, निवृत्ती देवरे, वसंतराव देशमुख यांचे हस्ते सपत्नीक गव्हाण पूजा करण्यात आली.इथेनॉल प्रकल्पाची पाहणी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व मान्यवरांनी केली.कार्यकारी संचालक हेमंतराव माने,डिस्टीलरी प्रमुख सुदाम पवार यांनी माहिती दिली. स्वागत व्हा.चेअरमन उत्तमबाबा भालेराव यांनी केले आभार संचालक शहाजी सोमवंशी यांनी मानले.कादवा कामगार युनियन तर्फे अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे व पदाधिकाऱ्यांनी पाटील,झिरवाळ यांचे स्वागत केले. यावेळी प्रादेशिक सह संचालक भालेराव,जिल्हा उप निबंधक सतीश खरे,सहाय्यक निबंधक विघ्ने,विशेष लेख परीक्षक निकम, माजी जिप उपाध्यक्ष प्रकाश वडजे,सदाशिव शेळके,संजय पडोळ,विश्वासराव देशमुख,अशोक वाघ,प्रमोद अपसुंदे,बाळासाहेब देशमुख,बाळासाहेब गायकवाड,विलास बोरस्ते,सुरेश कळमकर,राम आहेर,भास्कर भगरे,अनिल देशमुख,बाळासाहेब मेधने, वसंतराव कावळे,वसंतराव जाधव,संजय जाधव,विठ्ठलराव जाधव,विठ्ठल संधान,दत्तात्रेय जाधव,प्रमोद देशमुख,पंडितराव निकम,जिप सदस्य अशोक टोंगारे,भाऊसाहेब बोरस्ते,भाऊसाहेब देशमुख,बाकेराव जाधव,प्रकाश पिंगळ,किसन भुसाळ, विजय शिंदे,विलास कड,अशोक घोडेराव,तानाजी कामाले,मच्छीन्द्र पवार,तुकाराम जोंधळे,राजेंद्र ढगे,शाम हिरे,राजेंद्र उफाडे,डॉ योगेश गोसावी आदींसह सर्व संचालक ,अधिकारी सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला.
इथेनॉल प्रकल्प ठेवींचा ओघ सुरूच
इथेनॉल प्रकल्पासाठी कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सभासद ऊस उत्पादक यांना ठेवी देण्याचे आवाहन केले ठेवींवर १० टक्के व्याज देण्याचे जाहीर केले त्यास सभासदांचा प्रतिसाद मिळत असून आज पाच शेतकऱ्यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे उपस्थितीत १८ लाखाचे ठेवींचे धनादेश दिले.त्या शेतकऱ्यांचा पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.आजपावेतो सुमारे तीन कोटींच्या ठेवी ठेवण्यात आल्या .