दिंडोरी: तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने घुमशान घातले असून अवनखेड वलखेड भागात झालेल्या वादळी पावसात द्राक्ष टोमॅटो आदी भाजीपाल्यासह ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. वलखेड अवनखेड पिंपळगाव केतकी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पाऊस होत वादळ वाऱ्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान होत ऊस जमीनदोस्त झाले. ऊसासह द्राक्ष बागा,टोमॅटो,भाजीपाला ,सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले.सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते प्रकाश पिंगळ यांनी केली आहे.