दिंडोरी : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक पदी दिंडोरी येथील युवा द्राक्ष उत्पादक राजेश(सागर) सुरेश जाधव यांची निवड झाली आहे. पुणे येथे द्राक्ष बागायतदार संघाची बैठक होत कार्यकारिणी निवड करण्यात आली. सध्या नाशिक विभागीय संचालक असलेले राजेश(सागर) सुरेश जाधव यांना राज्य संघाचे संचालक पदी बढती देण्यात आली आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोकदादा गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली युवा द्राक्ष उत्पादक राजेश(सागर) जाधव हे द्राक्ष उत्पादकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल युवा नेते माजी जि.प. सदस्य यतीन कदम यांनी त्यांचा सत्कार केला. द्राक्षाचे विविध नवीन व्हरायटी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत द्राक्ष उत्पादकांच्या विविध समस्या सोडविण्यात येऊन द्राक्ष बागायतदार संघाचे माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नीशील राहू असे नवनियुक्त संचालक राजेश (सागर) जाधव यांनी सांगितले जाधव यांच्या निवडीचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.