दिंडोरी : आगामी नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती व बाजार समितीसह सर्व निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे असे आवाहन शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी दिंडोरी येथे केले. दिंडोरी येथे आदिवासी सांस्कृतिक भवन येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद दौर्यामध्ये बोलताना भाऊसाहेब चौधरी म्हणाले कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम उभे केले आहे त्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यात यश आले आहे देशात मुख्यमंत्र्याच्या कामाची दखल अनेकांनी घेतली आहे चांगले काम करण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात पहिल्या क्रमांकावर आहे इतर लोकाभिमुख कामे विद्यमान महाविकास आघाडी सरकारने केली आहेत. ती कामे तळागाळातील जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी प्रयत्न करावे महाविकास आघाडी सरकार एकोप्याने काम करत करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात व राज्यात आगामी होणाऱ्या नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होत आहेत. निवडणुका या कार्यकर्ते व संघटनेच्या जोरावर लढवल्या जातात त्यामुळे सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी केली जाईल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
तुम्ही जनतेचे कुठलेही काम आणा आपण आपले मुख्यमंत्री आहेत आपण ते मार्गी लावू शिवसेनेचे कार्यकर्ते व संघटन हेच महत्त्वाचे आहे. आपण आपल्या गावात चांगले काम करावयाचे आहे. मुंबई सारखे ग्रामीण भागात महिला संघटना उभी राहिली पाहिजे. चांगले काम करून सेनेला बळकटी द्यावी पदाधिकारी यांनी पदाचा वापर जनसेवेसाठी करावा असे मनोगत भाऊसाहेब चौधरी यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील भाऊ पाटील, माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे, उपजिल्हाप्रमुख नाना मोरे,जयराम डोखळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी तालुक्यातील समस्या निकृष्ट रस्ते, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करू नये, जमिनीचे लिलाव व कर्ज वसुली थांबवावी, स्थानिकांना रोजगार मिळावा इत्यादी समस्या याठिकाणी मांडल्या डॉ. विलास देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचे आभार मानले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, जयराम डोखळे, युवासेनेचे जिल्हाधिकारी नदिम सय्यद, शिवसेना उपतालुका प्रमुख रावसाहेब जाधव,योगेश दवंगे शहर प्रमुख संतोष मुरकुटे, विलास केदार, तानाजी गावित, विश्वास गोजरे, प्रभाकर जाधव,जनार्दन वाघ, विजय पिंगळ,अविनाश वाघ, जिल्हा समन्वय संगम देशमुख, उपजिल्हा अधिकारी किरण कावळे, युवा तालुका अधिकारी निलेश शिंदे,नारायण राजगुरु,अरुण गायकवाड,विलास भागवत, माणिक उफाडे, दशरथ उफाडे, शिवराज गोडसे, अशोक निकम,सोनू देशमुख,वसंत घडवजे,सोमनाथ निंबेकर,शाम वाघमारे, अमोल कदम,जगन सताळे,पप्पू शिवले, अवी खान,गणेश हिरे,ज्ञानेश्वर शिंदे,बाळू निसाळ, महिला आघाडी अस्मिताताई जोंधळे, सौ. सुवर्णाताई चुंबळे,उज्वला बोराडे व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक युवा सेना महिला आघाडी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.