दिंङोरी – दिंडोरी शहरात गुरुवारी दुकाने फोडुन झालेल्या चोरीचा तपास लागलेला नसतानाच रविवारी निळवंडी रोडला दहा दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. हजारो रूपयाची चोरी केली करण्यात आली असून दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. शुक्रवारी रणतळ परिसरात टपरी फोडण्यात आली होती तर दुचाकी ही चोरी गेल्याची घटना घडली आहे. सातत्याने होणाऱ्या घरफोड्या मुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १३ रोजी राञीच्या सुमारास दिंडोरी शहरातील निळवंडी रोडवरील स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स मधील कीटकनाशक व शेती उपयोगी औषधी दुकान,अटोमोबाईलस, देशदूत विभागीय कार्यालय,वकीलांचे ऑफिस व त्याच प्रमाणे इतरही दुकान फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून १४ हजार ७०० रुपायाची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. दुकानं मधील कॉम्पुटर व इतर मुदेमाल चोरी गेला नसला तरी देखील मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान करण्यात आले आहे. दिंडोरी शहरात लागोपाठ घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस यंञणा खडबडून जागी झाली असून या घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे. याबाबत व्यावसायिक सुनील बाळासाहेब पाटील यांनी दिंडोरी पोलिसात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक मोनिका जेजोट आदीसह पोलीस कर्मचारी करत आहे.