दिंडोरी –कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, कुणीही आजार अंगावर काढू नये कोरोनाचे लक्षण समजताच नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करत उपचार घेतल्यास कोरोनावर मात नक्कीच होते, असे प्रतिपादन विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले,
दिंडोरी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृह इमारतीत साठ ऑक्सिजन बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर चे लोकार्पण साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे व आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी झिरवाळ बोलत होते. यावेळी उपविभागीय डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, मुख्याधिकारी नागेश येवले, वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे, डॉ विलास पाटील, माजी नगरसेवक माधवराव साळुंखे, कैलास मवाळ, अविनाश जाधव पोलीस निरीक्षक अनंत तारगे, उपस्थित होते, यावेळी श्रीराम शेटे म्हणाले की दिंडोरी तालुक्यात ऑक्सीजन बेडची कमतरता आमदार नरहरी झिरवाळ यांच्या माध्यमातून आता जाणवणार नाही, या कोविड केअर सेंटर च्या माध्यमातून जनतेची सेवा करून रुग्णांना दिलासा द्यावा असे सांगितले, आमदार नरहरी झिरवाळ म्हणाले की दिंडोरी तालुक्यातील जनतेसाठी वनी येथे ऑक्सिजन बेडचे दोन कोविड सेंटर सुरू होते, तरीही नागरिकांची मागणी व कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता प्रशासनाच्या व लोकसहभागाच्या माध्यमातून साठ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे, सेंटरमध्ये येण्याची वेळ कोणावर येऊ नये, सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, आज दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे असे सांगितले, यावेळी माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, गंगाधर निखाडे, जिप सदस्य अशोक टोंगारे, सुरेश देशमुख, विश्वास देशमुख, डॉ. दीपक बागमार, शांताराम चारोस्कर, दिनकर काजळे, आदी उपस्थित होते, आभार स्विय सहाय्यक धनराज भट्टड यांनी मानले.
परनोल रिकार्ड कडून ५० फोवलेर बेड
सदर कोविड सेंटरसाठी विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सर्वांनी हातभार लावण्याचे मदतीचे आवाहन केले होते नेहमी सामाजिक कामास हातभार लावणाऱ्या परनोल रिकोर्ड कंपनीने ५० फोवलेर परिपूर्ण बेड दिले तसेच इतर काही कंपन्यांनीही हातभार लावला सोबतच विविध नागरिकांनी यात मदत करत एकसुसज्ज कोव्हिडं सेंटर सुरू झाले आहे.