दिंडोरी : दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी बाळासाहेब दौलतराव दिवटे तर व्हा.चेअरमन पदी मनोहर आनंदा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठरलेल्या अवर्तनानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने ,सहाय्यक मिलिंद परदेशी यांचे उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया होऊन चेअरमन पदासाठी बाळासाहेब दिवटे व व्हा चेअरमनपदासाठी मनोहर चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.यावेळी माजी चेअरमन दिलीपराव जाधव,माजी व्हा.चेअरमन खंडेराव संधान,बाळासाहेब जाधव,गंगाधर निखाडे,बाळासाहेब गायकवाड,रामदास पिंगळ,डॉ.पुंडलिक धात्रक,रमेश मवाळ, राजाराम सोनवणे,भरत कड,रघुनाथ गायकवाड,विमल हरिकमहाले,वैशाली नाठे आदी सर्व संचालक उपस्थित होते.