दिंडोरी : गेल्या एक दोन वर्षभरापूर्वी जवळके वणी – मातेरेवाडी – राजापूर या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करत काम झाले आहे. मात्र सदर रस्त्या पूर्णतः खराब होत मोठमोठे खड्डे पडले आहे. सदर रस्ता कामाचे तरतुदीत किमान पाच वर्षे देखभाल दुरुस्ती ही संबंधित ठेकेदारांकडे आहे. मात्र सदर दुरुस्ती करून घेण्यात संबधीत अधिकारी दुर्लक्ष करत आहे. तरी सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार धनराज महाले यांनी दिला आहे. सदर रस्त्यावर कोट्यवधी निधीचा खर्च झालेला आहे मात्र सदर काम होत असताना अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले असून एक वर्षात सदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठं मोठं खड्डे पडले आहे. सध्या या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहने चालवणे जिकरीचे होत असून अनेक दुचाकी चे अपघात होत आहे. सदर रस्त्याची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदार यांची असताना दुरुस्ती होत नसल्याने वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहेत. संबधीत अधिकारी ठेकेदार यांनी त्वरित सदर रस्त्याची पक्की दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार धनराज महाले यांनी दिला आहे..