दिंडोरी – दिंडोरी तालुक्यातील रामशेज आशेवाडी या ठिकाणी वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात गावात दहा दिवसांत सहा कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित आईला ऑक्सिजन बेड न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर तिच्या तरुण मुलीने सॅनिटायझर पित आत्महत्या केली. दरम्यान तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मायलेकींच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवार दिनांक १ मे रोजी पहाटे जया लक्ष्मण भुजबळ वय ५० यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे नाशिकरोड येथील बिटको कोविड़ सेंटरला भरती केले गेले होते. पण, ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी मुलीला समजल्यानंतर ती अस्वस्थ झाली व तिने सॅनीटायझर पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. मुलीला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा देखील मृत्यू झाला असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे
आशेवाडी रामशेज येथे १० ते १२ दिवसांमध्ये सहा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायती तर्फे आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत असून येथे ग्रामसेवक नसून तात्पुरता कार्यभार शेजारील ग्रामसेवकांना दिलेला आहे. तरी येथे कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान गोरगरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परवड होत आहे.
यतीने उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.