दिंडोरी – येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते व पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या उपस्थित दिंडोरी येथे करण्यात आले. दिंडोरी येथील तहसील मधील जुनी इमारत कामकाजाच्या दृष्टीने अपुरी पडत असल्याने वनविभागाने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ असलेल्या जागेत नवीन प्रशस्त इमारत बांधण्याचे ठरवले झिरवाळ यांनी पाठपुरावा करत सदर कामास मंजुरी मिळवली. त्याचे भूमिपूजन झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी झिरवाळ यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास उपवनसंरक्षक पूर्व भाग तुषार चव्हाण माजी जि प उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कादवा कारखाना संचालक बाळासाहेब जाधव दिंडोरीचे उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, सहाय्यक वनसंरक्षक संजय मोरे, सहा. वनसंरक्षक जंकास दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगोडे वनविभागाचे कर्मचारी वैभव गायकवाड दिगंबर भोये गोरख गांगोडे, अण्णा टेकणार, हिम्मत सावकार, श्रावण कामडी, बुरुंगळे, रेखा चौधरी, रूपाली देवरे, शांताराम शिरसाट, चंद्रभान जाधव, बंगाळ आदी उपस्थित होते.