दिंडोरी – दिंडोरी नगरपंचायत स्थापना सप्ताहच्या औचित्य तसेच माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियान अनुषंगाने निबंध,चित्रकला व छायाचित्रण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.
४ जुलै पासून सदर स्पर्धा सुरू झाली असून नऊ ऑगस्ट अंतिम मुदत आहे. प्रशासक तथा तहसीलदार पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धा व छायाचित्रण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पारितोषिक देण्यात येणार आहे. माझ्या कल्पनेतील दिंडोरी ,पर्यावरण सुधारण व संरक्षण काळाची गरज,पर्यावरण पूरक नाविण्यपूर्ण कल्पना व आपले राहणीमान व पर्यावरण या विषयावर शालेय विद्यार्थी, दिंडोरी शहरातील सर्व नागरिक दोन्ही गटांसाठी निबंध स्पर्धा होणार आहे.
पर्यावरण, कोरोना विषाणू जनजागृती व दिंडोरी शहराचा ऐतिहासिक वारसा या विषयांवर शालेय विद्यार्थी गट व खुला दिंडोरी शहरातील सर्व नागरिक या गटासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. दिंडोरी नगरपंचायतच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यासाठी दिंडोरी शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक ऐतिहासिक वारसा इ. चे छायाचित्रण स्पर्धा होत आहे
निबंध स्पर्धेकरिता ८०० ते १००० शब्दांची मर्यादा असेल. निबंध व चित्रकला स्पर्धेकरिता एका स्पर्धेकाला प्रत्येक स्पर्धेकरिता एकदाच भाग घेता येईल. निबंध व चित्र शालेय गटातील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत जमा करावे. खुल्या गटातील स्पर्धकांनी निबंध / चित्र दिंडोरी नगरपंचायत कार्यालयात जमा करावे. छायाचित्र स्पर्धेकरिता स्पर्धकाने स्वतः टिपलेले छायाचित्र मूळ स्वरूपात स्वयंघोषणापत्र भरून सादर करावेत इंटरनेटवरील तसेच इतरांचे कॉपीराइट असलेले छायाचित्र ग्राह्य धरले जाणार नाही. असे स्पर्धेचे नियम असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.