दिंडोरी – दिंडोरी शहरात आधार कार्ड सेंटर सुरू नसल्याने नागरिकांना आधार अपडेटसाठी वणवण करावी लागत आहे. शहरात आधार केंद्र सुरू करण्याची मागणी वारंवार होत असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांची परवड सुरू आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दिंडोरी शहरात आधार कार्ड केंद्र बंद आहे. नेमके आधार केंद्र कुठे सुरू आहे त्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना वणवण फिरावे लागते. अनेकदा चुकीची माहिती मिळत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या कामावर होतो. त्यामुळे दिवस पैसा वेळ वाया जात आहे. अनेकदा नागरिकांना आधार कार्डसाठी पिंपळणारे उमराळे मोहाडी खेडगाव आदी भागात जावे लागत आहे. जसे लशीकरणासाठी वणवण करावी लागते त्या पद्धतीने आधार कार्ड मिळण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या पीएफला आधार जोडणी नसल्यास पीएफ खाते बंद झाले आहे. ते सुरू करण्यासाठी आधार अपडेट असणे गरजेचे आहे तसेच विविध बँक खाते व सरकारी कामात आधार अपडेट आवश्यक असल्याने नागरिकांना दिंडोरी तालुक्याचे ठिकाण असून आधार केंद्र नसल्याने गैरसोय होत आहे.
….