दिंडोरी – दिंडोरी शहरातील ग्रीनसिटी आता हिरवीगार होणार असून येथील युवकांनी एकत्र येत ग्रीन सिटी दिंडोरी अभियान मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दिंडोरीतील कादवा नगर परिसरात ग्रीन सिटी नावाची वसाहत गेल्या पाच सहा वर्षांपासुन नावारुपास आली आहे. दिंडोरी शहरातील हा भाग तसा मद्यमवर्गीय नोकरदारांचा म्हणुन ओळखला जातो. येथे रस्त्यांसाठी चांगली जागा सोडल्याने ग्रीनसिटीत वसाहतीची चांगली रचना झाली आहे. बहुतांश रोहाऊस आणि बंगले असल्याने ग्रीनसिटीला झळाळी मिळाली आहे. आता येथील युवकांनी एकत्रित येत ग्रीन सिटी अभियान सुरु केले आहे. ग्रीन सिटीत सर्वत्र झाडे लावण्याचा संकल्प यानिमित्ताने युवकांनी सोडला आहे.
ग्रीन सिटी दिंडोरी अभियानासाठी अरुणोदय सामाजिक संस्थेनेही पुढाकार घेतला आहे. या ग्रीन सिटी अभियानात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहे. जेवढ्या गल्लया आहेत, त्या सर्वांच्या रस्त्याच्या कडेला झाडे लावुन सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणुन येथील शासकिय मोकळ्या जागेत परिसरातील सर्व जेष्ठ नागरिक, युवक वर्ग एकत्रित आला. त्यांनी खड्डेही खोदले व वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली. त्यांना जगवण्याचे कामही सुरु केलेले आहे. विशेष म्हणजे ग्रीनसिटी अभियानात महिलांचाही आणि लहान मुलांचाही सहभाग असुन महिलावर्ग उत्साहाने सहभागी होत आहे.
वृक्षारोपण मोहिम राबवण्यासाठी नितीन धिंदळे, नितीन गांगुर्डे, , सतीश निकम, सुरेश राजोळे, अॅड. गणेश बोरस्ते, दिनेश धांडबळे, पुंडलिक चारोस्कर, संदिप वाघचौरे, रामदास महाले, राजु खिरकाडे, किशोर पाटील, नागेश सोमवंशी, गोरख पवार, राजेंद्र जाधव, कैलास गायकवाड, डॉ. बोरगुडेे, ज्ञानेश्वर पिंंगळे, विठ्ठल पिंगळे, अमोल उगले, धनंंजंय बोरस्ते, यादव बोरस्ते,मनोज मवाळ, विकी घोलप,वैभव गायकवाड आदी युवक परिश्रम घेत आहे. त्याचबरोबर आगामी काळात या परिसरात ग्रीन जिम उभी करण्याचा संकल्प युवकांनी सोडला आहे. वृक्षारोपण मोहिम यशस्वी झाल्यानंतर ग्रीन सिटीचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
…..
उपक्रम यशस्वी होत चालला
दिंडोरी शहरात ग्रीन सिटी अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानात ग्रीन सिटी, कादवा नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन होणार असुन परिसराचे सुशोभिकरणही होणार आहे.सर्व युवक, महिला, लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी होत चालला आहे.
नितीन धिदंळे, सामाजिक कार्यकर्ते, दिंडोरी