दिंडोरी- दिंडोरी तालुका रिपाईच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन दिंडोरी तालुक्यातील रमाई आवास योजना संदर्भात निधी उपलब्ध करून द्यावा,अनेक दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत हायमास्ट लाईट बसवणे. तसेच अनेक गावातील समाजमंदिर हे फार मोडकळीस आले आहेत खुपच दयनीय अवस्थेत आहेत, नविन समाजमंदिर बांधण्यात यावी,आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी नरहरी झिरवाळ यांनी ही कामे मार्गी लावण्यात येईल जिथे निधी कमी पडेल त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी रिपाइ तालुकाध्यक्ष सागर पगारे, उपाध्यक्ष प्रवीण गांगुर्डे, सरचिटणीस बाळासाहेब गांगुर्डे,दिलीप गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य बोपेगाव, मुकुंद गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य शिंदवङ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते