दिंडोरी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविडवर उपचार म्हणून केंद्र व राज्य सरकारने लसीकरण मोहीम सुरू केली. यात आतापर्यंत दिंडोरी तालुक्यात ३१ हजार ९३ जणांनी लसीकरण केले.यात काहींनी पहिला तर काहींनी दुसरा डोस घेतला आहे. यात सर्वाधिक लसीकरण तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले असून या केंद्रानंतर्गत ४ हजार ८९३ लाभार्थींना लस देण्यात आली आहे.
प्रांतअधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ विलास पाटील, वणी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ राजेंद्र बागुल यांनी नियोजन करून कोविड सेंटर व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्याचे काम सुरू आहेत.
दिंडोरी तालुक्यात एकूण १० प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या केंद्राच्या अंतर्गत येणारे उपकेंद्र व दिंडोरी ग्रामीण रुग्णालय व वणी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत सर्व फ्रंट वर्कर कर्मचारी , ४५ वयोगटाच्या पुढील नागरिक यांना पहिला व काहींना दोन्ही डोस देण्यात आले आहे.आतापर्यंत खालील प्रमाणे आरोग्य केंद्राच्या अंतर्गत लसीकरण झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगांव दिंडोरी (४८९७), प्राथमिकआरोग्य केंद्र मोहाडी(४६८५),प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाणे(४५३८),प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा(२३२२),प्राथमिक आरोग्य केंद्र खेडगाव (१९७६) प्राथमिक आरोग्य केंद्र उमराळे (१८४६), प्राथमिक आरोग्य केंद्र वारे(१४१४) प्राथमिक आरोग्य केंद्र कोचरगाव(१३१६), प्राथमिक आरोग्य केंद्र ननाशी(१२४९),प्राथमिक आरोग्य केंद्र निगडोळ (९०५) तसेच ग्रामीण रुग्णालय दिंडोरी (५५०८) व ग्रामीण रुग्णालय वणी (२८०) इतक्या लाभार्थीना लस देण्यात आली आहे.वणी येथील ग्रामीण रुग्णलयात कोविड सेंटर असल्याने त्याठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे.
१८ ते ४४ गटासाठी मोहाडी केंद्रावर १९० जण
केंद्र सरकारने व राज्य सरकारने १ मे महाराष्ट्र दिनांपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले असले तरी राज्यात लसीचा तुटवडा असल्याने त्या मोहिमेला ब्रेक बसतोय का काय? एकीकडे या गटातील जनेतला लस सुरू करण्याची घोषणा केली आहे.पण जिल्यात जेम तेम ५ ते ६ केंद्र सुरू झाली आहे.त्यात दिंडोरी तालुक्यात केवळ मोहाडी येथे १ मे पासून १८ ते ४४ च्या वयोगटातील ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केली आहे त्यांनाच लस दिली जात आहे.तीन दिवसांत याठिकाणी १९० जणांनी लसीचा लाभ घेतला असल्याची माहिती मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ लोणे यांनी दिली.
लसीकरणास चांगला प्रतिसाद- डॉ भारती चव्हाण
लसीकरण मोहिमेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून शासनाने दररोज लस उपलब्ध करून दिल्यास दररोज आम्हाला केंद्रात व उपकेंद्रातही लसीकरण करता येईल. तळेगांव दिंडोरी केंद्रांतर्गत येणारी गावे व दिंडोरी शहरातील नागरिक तालुक्यातील फ्रंट वर्कर कर्मचारी व नागरिकांनी या लसीकरनाचे डोस घेतले असून आमचे सर्व कर्मचारी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ भारती चव्हाण यांनी दिली.
तालुक्यातील जनतेला लस देण्यासाठी प्रयत्नशील- डॉ सुजित कोशिरे
दिंडोरी तालुक्यातील एकूण १० प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत व त्या केंद्राच्या उपकेंद्रांवर लसीकरण करण्यासाठी त्या ठिकाणचे सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहे. शासनाकडून लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर लगेच लसीकरण केले जात आहे.आतापर्यंत फ्रंट वर्कर कर्मचारी व ४५ च्या पुढील नागरिकांना लस दिली जात आहे.तसेच१ मे पासून १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांना ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केली आहे त्याना मोहाडी येथे लसीकरण सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार तालुक्यात अजूनही केंद्र सुरू करून सर्व लाभार्थीना नियोजन करून लसीकरण मोहीम राबविण्यात येईल.यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आव्हाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशिरे यांनी केले आहे.
प्रत्येक गावांत लसीकरण व्हावे- अनिल दादा देशमुख
दिंडोरी तालुक्यात ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याठिकाणी व उपकेंद्र आहे त्या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.पण ज्या गावांत उपकेंद्रच नाही त्या गावातील जनतेला वाऱ्यावर सोडू नये त्यांचेही लसीकरण करावे अशी मागणी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल दादा देशमुख यांनी केली आहे.तालुक्यातील आरोग्य विभागाने व प्रशासनाने निवडणुकीसाठी जशी अधिकारी कर्मचारी यांची यंत्रणा उभी केली जाते तशी यंत्रणा लसीकरणासाठी उभी करून सर्वाना समानतेने लसीकरणाचा लाभ घ्यावा अशीही मागणी देशमुख यांनी केली आहे.
दिंडोरी ग्रामीण रुग्णलयात दोन्ही लसी चे लसीकरण – डॉ विलास पाटील
दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णलयात को वॅक्सिंन व कोविशिल्ड या दोन्हीही लसीचे लसीकरण केले जात आहे.याठिकाणी इतरही ओपीडी नियमित सुरू असून लस उपलब्ध असल्यास आठवड्यातील सलग पाच दिवस लसीकरण सुरू असते.शासनाकडून मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा झाल्यास जास्तीत जास्त नागरिकांना लस देता येईल अशी माहिती दिंडोरी ग्रामीण रुग्णलयाचे अधीक्षक डॉ विलास पाटील यांनी दिली.
वणी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर- डॉ राजेंद्र बागुल
दिंडोरी तालुक्यात वणी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेन्टर सुरू असल्याने याठिकाणी २८० लाभार्थीना लसीकरण करण्यात आले.त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांमुळे लसीकरण बंद केले.या कोविड सेंटरवर आतापर्यंत ५५० कोविड रुग्ण दाखल झाले होते व त्यापैकी ५२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले व २५ रुग्ण मृत्यू पावले आहे.आताही ६० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ राजेंद्र बागुल यांनी दिली आहे.