दिंडोरी: नरहरी झिरवाळ यांनी सामाजिक जीवनात काम करताना नेहमी जनतेत राहत जनतेचे प्रश्न सोडवत मतदार संघाचा विकास केला असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पावती म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा आमदार केले आहे पक्षानेही त्यांचे कामकाज बघत त्यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून संधी दिली असून झिरवाळ हे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत राज्यातील विविध प्रश्न सोडविण्याबरोबरच मतदारसंघात विकासाची गंगा आणून सर्वांगीण विकास साधतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी व्यक्त केला.
कादवा सहकारी साखर कारखान्यावर व्यापारी संकुलाचे भूमिपूजन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना शेटे यांनी झिरवाळ यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत विविध विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या.यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्याला मतदारसंघातील जनतेने दिलेल्या प्रेमामुळे आपला जीवनप्रवास सुरू असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे .मांजरपाडा देवसाने प्रकल्पासह काही वळण योजना चे काम पूर्ण होत पाणी पूर्व भागात वळले आहे व काही काम अंतिम टप्प्यात असून मागील सरकारने रद्द केलेल्या पाच योजना पुन्हा सुरू करणार आहे.पेठ तालुक्यात विविध योजना प्रस्तावित आहे. तालुक्यात रस्त्यांचा प्रश्न गंभीर असून सर्व प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरण कामास मंजुरी मिळाली आहे.पावसाळी अधिवेशनात त्यास आर्थिक तरतूद होत सर्व कामे पूर्ण होतील.जनतेच्या प्रेमामुळे काम करण्यास मोठी ऊर्जा मिळत असून या उर्जाच्या जोरावर आपण मतदारसंघात विविध विकासकामे करून सर्वांगीण विकास साधू असा विश्वास झिरवाळ यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार दिलीप बनकर,माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील,बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील आदींची भाषणे झाली यावेळी माजी जिप उपाध्यक्ष प्रकाश वडजे,विश्वासराव देशमुख,अनिल देशमुख,बाकेराव जाधव,जिप सदस्य भास्कर भगरे,सिद्धार्थ वनारसे,डॉ योगेश गोसावी,शाम हिरे,राजेंद्र उफाडे, रघुनाथ गायकवाड, देवळा राष्ट्रवादीचे पंडित निकम,बाजार समिती माजी सभापती आहेर,कादवा संचालक सुखदेव जाधव,दिनकर जाधव,मधुकर गटकळ,,सुभाष शिंदे,त्रंबक संधान,साहेबराव पाटील,विश्वनाथ देशमुख,रघुनाथ जाधव,संपत कोंड आदींसह सर्व संचालक विविध गावचे सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासात अडथळा नको सहकार्य करा
तालुक्यात विविध विकासकामे मंजूर असून कोरोनामुळे पुढील कार्यवाही रखडली आहे मात्र तरी काही गरजेची कामे प्राधान्यक्रमाने आपण सुरू करण्यात सांगितले मात्र सदर कामे सुरू होताच त्याची वर्क ऑर्डर आहे का ? आदी ची विचारणा होत कामे थांबविले जात आहे . हा प्रकार बरोबर नाही होणारे काम थांबवू नका तर ते चांगल्या दर्जाचे करून घ्यावे तांत्रिक बाबी उपस्थित करत विकासाच्या गतीला बाधा आणू नका विकासकामे होऊ द्या असे कळकळीचे आवाहन झिरवाळ यांनी केले.
लसीकरणासाठी सर्वांनी प्रबोधन करा
कोरोनाचे संकट तूर्तास कमी झाले असले तरी टांगती तलवार कायम आहे लसीकरण हाच त्यावरील उपाय असून सर्वांनी लस घ्यावी आदिवासी भागात लसीकरणाबाबत विविध गैरसमज आहे ते दूर करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेच पण सर्वांनी आपल्याकडे असणाऱ्या मजुरांना लस घ्यायला सांगावी मी अनेक साधू महंत यांनाही त्यांचे भक्त गणांना लसीकरण करण्यासाठी आवाहन करावे जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन झिरवाळ यांनी केले.
झिरवाळ यांचे गुरुमाऊली यांचेकडून अभिष्टचिंतन
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रास भेट देत गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे आशीर्वाद घेतले यावेळी गुरुमाऊली यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी कादवा संचालक बाळासाहेब जाधव,बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख,रघुनाथ गायकवाड,उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, अविनाश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते .