४०.४० लाखांचा निधी विद्यार्थी अध्यापनासाठी खर्ची
दिंडोरी – विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष ना नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना ईलर्नींग इंटरॲक्टीव साहित्याचे वाटप करण्यात आले. दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना कोरोना कालावधीत ऑनलाईन शिक्षण घेतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालकांचे रोजगारासाठी स्थलांतर,ॲनरॉईड मोबाईल व इंटरनेट रेंजच्या अडचणीमुळे याभागातील मुले शिक्षणापासुन वंचित राहत असल्याचे शिक्षकांनी ना झिरवाळ यांच्या निदर्शनास आणले. त्यावर उपाय म्हणून अत्याधुनिक ईलर्निंग इंटरॲक्टिव शैक्षणिक साहित्याचे पेठ- दिंडोरीतील २७ शाळांना वाट ना. झिरवाळ यांचे हस्ते ईलर्निंग साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर साहित्य हाताळण्यास अगदी सहज आहे. त्यात १ ली ते १० वी पर्यंतचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. ना नरहरी झिरवाळ यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून ४०.४४ लक्ष रुपयांच्या खर्चातून दिंडोरी-पेठ तालुक्यातील २७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना साहित्य उपलब्ध करून दिले. वनारे येथे ना झिरवाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रल्हाद पवार यांनी केले. गोकूळ झिरवाळ यांच्या मार्गदर्शना खाली झालेल्या कार्यक्रमास कोरोना नियमांचे पालन करत जि प सदस्य अशोक टोंगारे,वानरे ग्रामपंचायत सरपंच दीपक झिरवाळ,धनराज भट्टड ,विशाल बस्ते,चंदन वाघ,तेजस निरभवणे, दिंडोरी आणि पेठ गटशिक्षणाधिकारी, लाभार्थी शाळेचे शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.