पाऊस होताच अक्राळे फाटा ते लखमापूर फाटा परिसरात सातत्याने अपघात होत असून रणतळे परिसरात तर रोज पाच दहा वाहने घसरून अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.आमदार नरहरी झिरवाळ यांनी शनिवारी प्रत्यक्ष सर्व अपघात प्रवण क्षेत्रास भेट देत उपस्थित नागरिकांच्या उपाययोजनांबाबत सूचना ऐकून घेत त्याबाबत बांधकाम विभागास तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिला.रणतळ येथील उतारावर दोन्ही बाजूला स्पीडब्रेकर बाजूला पट्टे पूर्ण रस्त्याला मध्यभागी सफेद पट्टा, साईडपट्टे , रेडियम पट्टे, रबरी ग्लाम्बर दिशादर्शक फलक झेब्रा पट्टे मारण्यास सांगण्यात आले. अवनखेड कादवा नदी पुलाजवळ रोड अप्रोच डिव्हायडर दिशादर्शक पट्टे मारणे,लखमापूर फाटा,अवनखेड,वलखेड फाटा ,मार्केट गेट ,सिडफार्म ,रणतळ आदी ठिकाणी स्पीडब्रेकर रबरी ग्लाम्बर आदी उपाययोजना तसेच अक्राळे फाटा उतारावरील पूल रुंदीकरण आदी कामे तातडीने करण्याचे ,संपुर्ण रस्त्यास रस्ता सुरक्षा दृष्टीने उपाययोजना नियमित देखभाल दुरुस्ती करण्याचे आदेश झिरवाळ यांनी दिले.
यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्र यांनी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे आश्वासन देत ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना केल्या. यावेळी एच, पी एम कंपनीचे देशमुख,गीते, कादवा संचालक बाळासाहेब जाधव,विश्वासराव देशमुख,जिप सदस्य भास्कर भगरे उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख,शाम हिरे,नरेश देशमुख,,बबन जाधव,अविनाश जाधव,जयवंत जाधव,रामदास पिंगळ, सुनील पाटील,स्वप्नील पवार ,डॉ राहुल जाधव,दत्तू भेरे आदी उपस्थित होते.