दिंडोरी : कोरोना …..माझे कुटुंब माझी जबाबदारी — कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव यांच्या चौरंग फार्म दिंडोरी मध्ये कोरोना सारख्या भयानक संकटा वरती कशाप्रकारे जाधव कुटुंबाने घरी राहून मात केली याचे अतिशय सुंदर वर्णन प्रा. डॉ. घनशाम जाधव, सयोगी प्राध्यापक कॉलेज ऑफ फार्मसी यांनी केले . या परिस्थीमध्ये सर्व ग्रामीण भागातील एकत्रित कुटुंबा करीता ही गोष्ट आशेचे किरण आहे. ….
३ एप्रिल तीस जणांच्या एकत्र कुटुंबामध्ये एकाच वेळी एकाच दिवशी सहा कुटुंबीयांना ताप डोकेदुखी अंगदुखी या करोना सदृश्य लक्षणांची लागण झाली. घरामध्ये डॉक्टर असल्या कारणाने ही करोनाची लक्षणे आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आले. लागलीच सर्व कुटुंबीयांची आरटीपीसीआर चाचणी करून घेतली.
३० जणांच्या एकत्र कुटुंबामध्ये २५ कुटुंबीय हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांमध्ये भय, अनिश्चितता, चिंता काळजी याचे विचारचक्र सुरु होते. सगळ्यात मोठ्या आजी ८७ वर्षाच्या त्यानंतर ७ जण वयाची ६० ओलांडलेले, सर्वात लहान बाळ दीड वर्षाचे अशी भयावह स्थिती. अशा बिकट परिस्थितीमध्ये सर्व कुटुंब एकत्र येत एकमेकांना आधार दिला. त्यानंतर सर्व कुटुंबियांच्या रक्ताच्या तपासण्या करून सनराइज् हॉस्पिटलचे डॉक्टर वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांची ट्रीटमेंट चालू करण्यात आली. बरोबर डॉक्टर राहुल जाधव, होमिओपॅथिक तज्ञ, यांच्याकडून सर्व पेशंटसाठी होमिओपॅथिक औषधेही सुरुवात करण्यात आली. उत्तम आहार घरामध्ये खेळीमेळीचं वातावरण डॉ. वैभव पाटील व डॉ. राहुल जाधव यांचे योग्य मार्गदर्शन या बरोबरच प्रा . डॉ. घनशाम जाधव त्यांच्या फार्मसी क्षेत्रात असल्या आज पर्यंतच्या अनुभवावरती डॉ. राहुल जाधवला मदत करत योग्य नियोजन केले. सर्व कुटुंबाला मानसिक धीर देत या महाभयंकर कोरोनाच्या संकटामधून सर्वाना आजारापासून मुक्त केले.
पहिल्या सात दिवसांमध्येच कुटुंबातील बहुतांश सदस्यांची तब्येती मध्ये सुधारणा दिसून झाली. सात दिवसानंतर करण्यात आलेल्या एचआ सिटी रिपोर्ट मध्ये सगळ्या कुटुंबियांचा स्कोर झिरो होतो. सर्व कुटुंबीय दहा दिवसानंतर कोरोना मुक्त झाले.
कुटुंबियांनी सांगितले आम्ही काय केले ?
१) टेस्टला घाबरलो नाही विनाविलंब टेस्ट केल्या लवकरात लवकर निदान केले.
२) कोरोना मध्ये पहिले पाच ते सात दिवस हे अतिशय महत्त्वाचे असतात या दरम्यान जर आजार लक्षात आला त्यावर योग्य उपचार झाले तर बऱ्यापैकी पेशंटला पहिल्या सात दिवसांमध्ये फरक पडून जातो व त्याला होणारे पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येऊ शकतात
३) करोना मध्ये प्रतिकार शक्ती किंवा स्वतःची चेतना शक्ती याचा फार मोठा वाटा असतो बरोबर होमिओपॅथिक औषधे चालू केल्यामुळे सगळ्या कुटुंबियांचे प्रतिकारशक्तीही अबाधित राहिली व त्यामुळे ते लवकरात लवकर बरे होऊ शकले
४) होमिओपॅथी ऍलोपॅथी या युद्धामध्ये न पडता दोन्हीही पाच इंची औषधांची स्वीकारणं केली दोन्ही औषध चालू ठेवले डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले त्यामुळे ८७ वर्षांच्या आजींनी सुद्धा करोनावर मात केली
५) होमिओपॅथिक औषधे नियमितपणे घेतल्यामुळे कुठल्याही पेशंटला निमोनियाची लागण झाली नाही. प्रतिकारशक्ती चांगली राहिल्यामुळे ॲलोपॅथी व होमिओपॅथी या दोन्ही औषधांच्या मदतीने कुटुंबाची लवकरात लवकर कोरोनाच्या विळख्यातुन मुक्तता झाली.
६) आश्चर्याची बाब म्हणजे २५ पेशन्ट पैकी फक्त सात जणांना fabiflu या औषधाची गरज पडली
७) लसीकरणाचा ही फायदा होताना दिसतोय घरातली ५ जेष्ठांनी एक महिन्यापूर्वी लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता.