दिंडोरी – स्वराज्य संवर्धन बहुउद्देशिय संस्थेचा शिवराज्यभिषेक दिनी आनोखा उपक्रम राबवत किल्ले अहिवंत वरती १०१ भारतीय वंशाच्या जंगली झाडांचे रोपण करुण त्यांचे जतन करण्याचा संकल्प केला. त्याचबरोबर नेहमीच स्वराज्यातील किल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असणारी ही संस्था या वर्षी १००१ वृक्षांचे रोपण करुन त्यांना वेळोवेळी खतपाणी देऊन संवर्धन करणार असून त्याची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमाला निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी तरुण मोलाचे काम करत आहे. या उपक्रमात भाऊसाहेब कुमावत, प्रविण सोमवंशी, प्रविण भेरे,प्रविण घोलप,समाधान जाधव,दिलीप सोनवणे,मयुर घुले,कुणाल पेखळे,शाम हिरे,सागर साळवे,आशिष घोलप,बाळनाथ जाधव,पंकज ठाकरे,सोमनाथ घोलप,निलेश शिंदे,सोमनाथ घोलप,पंकज ठाकरे,अनिल वडजे,अमोल सोमवंशी,संजय बोडके,सचिन भामरे,रमेश सोमवंशी,सुयशा चव्हाणके,साहिल सोनवणे,वृक्षांक घुले,पुर्विश बोडके,रुद्र चव्हाणके,कुमार सोनवणे यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन दिंडोरी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष शाम हिरे यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी पुढील मोहीमेंसाठी सहभाग घेण्याचे आश्वासन दिले.