दिंडोरी – तालूक्यातील खतवड येथील शेतकरी नारायण लहाणू जाधव यांचा विजेचा शॉक लागून मुर्त्यु झाला आहे. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिंडोरी तालूक्यातील खतवड येथील शेतकरी नारायण लहाणू जाधव हे सकाळी गावातील खंडेराव मंदिरात देवदर्शनाला गेले असता मंदिरा समोर असलेल्या विद्युत खांबावरील लोखंडी स्टेला हात लागला असता,जबरदस्त शाॅक लागला.यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले.परंतू उपचारापुर्वीच त्यांचा मुर्त्यु झाला असल्याचे डॉक्टरानी घोषित केले.
दिंडोरी उपविभागीय विजवितरण कंपनीचे मुख्यअभियंता सुनिल राऊत,महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अमोल धमके ,तलाठी तात्या दिंगबर राऊत,पोलिस पाटील सोमनाथ मुळाणे,ग्रामसेविका आर. एच. काथेपुरी,लाईनमॅन प्रशांत पिंगळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सुकदेव खुर्दळ यांनी गावातील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलण्याची मागणी संबधित विभागाकडे केली आहे.
नारायण जाधव हे नेहमीच गावातील सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत असत.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.