दिंडोरी : तालुक्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली वादळवारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे कोसळले तर काही ठिकाणी शेडनेटचे नुकसान होत पिकांचे नुकसान झाले. लोखंडेवाडी येथे प्रभाकर उगले यांचे शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडत झाड पेटले सुदैवाने जवळपास कुणी नसल्याने इतर हानी झाली नाही शिंदवड येथे आज ३.३० वाजता पूर्वमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजरी लावल्याने शिंदवड व परिसरात नदी नाल्याना पूर आल्यामुळे पिकांचा नुकसान झाले असून या वादळी पावसाने ठिक-ठिकाणी झाडे पडली असून परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला आहे. त्याचप्रमाणे तालुक्याच्या अन्य भागातही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाने आज हजेरी लावली आहे. या मान्सून पूर्व पावसाने द्राक्षबागेतील काड्याचे नुकसान झाले तर काही ठिकाणी सिमला मिरचीच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. दोन तास अचानक पडणाऱ्या पावसाने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे दिंडारी व चांदवड तालुक्यातील जोडणा-या फरशीवरून पाणी पडल्यामुळे वाहतुक बंद झाली होती. फरशीवरून पाणी पडल्यामुळे फरशीचेही नुकसान होत आहे. अनेक वेळा शासन दरबारी या फरशी संदर्भात तक्रार करूनही फरशीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे शिंदवड येथील ग्रामपंचायत सदस्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे काही दिवसापूर्वी तक्रार केली आहे. मात्र अजूनही या फरशी कामा संदर्भात दखल घेतली गेली नाही. शिंदवड सह खेडगाव तिसगाव दिंडोरी पाडे पालखेड वलखेड कादवा कारखाना परिसर जोपुळ लोखंडेवाडी आदी बहुतांशी गावात जोरदार पाऊस झाला.वादळी पावसाने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला पाऊस उघडताच कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केल्याने दिंडोरी शहरासह काही गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला.