दिंडोरी : नाशिक पेठ रोडवरील रामशेज आशेवाडी गावाजवळ ओमीनी गाडीत अवैध दारू विक्री करणारे यांच्यावर दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. काल रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली मसोबा नाकाबंदी नाशिक ते पेठ रोडवर पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस शिपाई मधुकर बेंडकोळी तसेच होमगार्ड असे नाकाबंदी करीत असताना मिळालेल्या गुप्त बातमी मिळाली. नाशिक ते पेठ रोड वरील आशेवाडी गावाजवळील कमानीजवळ सापळा रचून एक ओमीनी गाडी क्रमांक एम एच 15 EP0679 या गाडीत सोमनाथ बाबुराव शिंदे (३६) व परसराम काशिनाथ शिंदे (४०) दोघेही राहणार वैदूवाडी म्हसरूळ हे दोघे जण अवैधरित्या बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळले. त्यांच्याकडे एकूण २९६ देशी प्रिन्स संत्रा दारूच्या बाटल्यासह एकूण किंमत १,६०,१९२ रुपये किमतीच्या मुद्देमाल मिळून आला. सदर इसमाविरुद्ध अवैध चोरून दारूविक्री, कोरोना विषाणू रोग संदर्भात कलम नुसार दिंडोरी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.