नाशिक – दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावातील शेतजमिनीचे बाजूस असलेल्या वन क्षेत्रातून पाण्याची पाईपलाईन घेण्याकरीता चारी खोदली होती. सदर खोदलेल्या चारीवरुन तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्याच्या मोबदल्या तक्रारदाराकडून १ लाखाची लाच मागीतली होती. त्यानंतर ५० हजार रुपयांची लाचेची मागणी वनसंरक्षक उसमान गणी यांनी केली. त्याला दोन जणांना प्रोत्यासन दिले. त्यामुळे तीन जणांविरुध्द ही कारवाई करण्यात आली आहे. या तिघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. यामध्ये वन परिमंडळ अधिकारी अनिल चंद्रभान दळवी, वनसंरक्षक उसमान गणी गणीमलंग सय्यद व सुरेखा अश्रुबा खजे यांचा समावेश आहे. या तिघांविरुध्द वणी पोलीस स्टेशमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.