दिंडोरी : कोरोनाच्या या संकटात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटक काम करत असून सदर साथ रोखण्यासाठी नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत आहे यापुढेही सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घेत कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
दिंडोरी येथे ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली तिचे लोकार्पण विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी झिरवाळ यांनी कोरोनाचा प्रार्दुभाव व उपचार याचा आढावा घेतला तसेच लसीकरणाची माहिती घेतली.दिंडोरी शहराची लोकसंख्या बघता येथे लसीकरण केंद्र वाढवावे वहोते. जास्त लस उपलब्ध करून देण्याची मागणी विश्वासराव देशमुख,उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, रणजित देशमुख यांनी केली झिरवाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत दिंडोरीत वाढीव लस देण्याच्या सूचना केल्या.दिंडोरी ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिकेची नितांत गरज होती पालकमंत्री छगन भुजबळ,प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे नागरिकांनी आभार मानले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ विलास पाटील,डॉ. काळे,उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, विश्वासराव देशमुख,माधवराव साळुंखे,अविनाश जाधव,रायुका तालुकाध्यक्ष शाम हिरे,दत्तात्रेय जाधव,प्रितम देशमुख,रणजित देशमुख,अनिकेत बोरस्ते आदी उपस्थित होते.