दिंडोरी : संपूर्ण भारतभर कोविड-19 चे संकट जनतेस त्रस्त करत असताना, ऑक्सिजन असो, रेमडीसीवर इंजेक्शन असो, लस असो, यावर केंद्र सरकार स्वतः नियंत्रण ठेवत असून महाराष्ट्र सरकारला वेळेवर पुरेसा साठा पुरवत नाही, त्यातच पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार करत, तसेच हे सर्व कमी की काय म्हणून केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीही भरमसाठ वाढवल्या आहेत यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी राजाचे कंबरडे मोडले आहे, या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दिंडोरीत पेट्रोल पंपावर गांधीगिरी पद्धतीने म्हणजेच पेट्रोल पंपावरील ग्राहकास गुलाबपुष्प देऊन आंदोलन करण्यात आले.
दिंडोरी शहरातील एच पी पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दिंडोरी तालुकाध्यक्ष श्याम हीरे यांच्या नेतृत्वाखाली कोविड19 चे नियम पाळून सोशल डिस्टन्स पाळत गांधींगिरीने आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर भगरे(सर),बाजार समितीचे उपसभापती अनिल दादा देशमुख,डाॅ.सेल जिल्हाध्यक्ष डाॅ.योगेश गोसावी,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तौसिफ मनियार,अंबानेर सरपंच संतोष रहेरे,भाऊसाहेब पाटील,निलेश गटकळ,भास्कर वसाळ,किरण दुगजे,बापु दुगजे,मोसिन शेख,संदीप गोतरणे,आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.