दिंडोरी : तालुक्यात वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर खतवड येथे जिप शाळेचे पत्रे उडून जात मोठे नुकसान झाले आहे.दिवसभर ढगाळ वातावरण व जोराचे वारे सुरू होते. रविवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला तर रात्रभर वादळी वारे सुरू होते सोमवारी सकाळी हलकासा पाऊस झाला.सकाळी नाशिक कळवण रस्त्यावर तळेगाव जवळ वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प झाली .स्थानिक नागरिकांनी जेसीबी च्या साहाय्याने झाड बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत झाली अवनखेड जवळ ही वृक्ष कोसळून वाहतूक विस्कळीत झाली.
खतवड येथे जिप शाळेचे पत्रे उडाले
खतवड येथील जिप शाळेचे वादळामुळे पत्रे उडून जात मोठे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.एक वर्षांपूर्वीच शाळेची दुरुस्ती होत पत्रे बद्दलविण्यात आले होते मात्र सदर काम निकृष्ट झाल्यामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आंब्याचे मोठे नुकसान
वादळामुळे तालुक्यात आंबे पिकाचे मोठे नुकसान झाले असून वाऱ्यामुळे आंबे गळून पडले आहे.