दिंडोरी : आशेवाडी ग्रामपंचायतमध्ये आमच्या खोट्या सह्या करत विकासकामांचा ३७ लाखांचा शासकीय निधी परस्पर मित्रांच्या खाती ग्रामसेवक दिलीप मोहिते यांनी वर्ग करत अपहार केल्याचा आरोप सरपंच जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच सुनीता संजय बोडके यांनी केला आहे. हा प्रकार आमचे लक्षात येताच आम्ही गटविकास अधिकारी दिंडोरी यांचेकडे तक्रार दाखल केली होती. तरी सदर फरार ग्रामसेवक त्यांचे साथीदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी आपण पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केलेली असल्याची माहिती सरपंच जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच सुनीता संजय बोडके यांनी दिली आहे.
आशेवाडी येथील शासकीय निधी अपहार प्रकरणी ग्रामसेवकांसह सरपंच उपसरपंच यांचेवर गुन्हा दाखल झाला असून या प्रकाराबाबत सरपंच व उपसरपंच यांनी आपली बाजू मांडत आपल्या खोट्या सह्या करत ग्रामसेवकाने अपहार केल्याचे सांगत सविस्तर माहिती दिली आहे. सदर ग्रामसेवक मोहिते यांनी माळे दुमाला येथे दोन वर्षांपूर्वी सरपंच यांची फसवणूक करून १४ वित्त आयोग निधीतून १४ लाख हडप केले आहे. देहरे येथे ही रक्कम हडप केली आहे. मात्र तात्कालिक गटविकास अधिकारी यांनी त्यांची पाठराखण केल्याचा आरोप केला आहे. सदर ग्रामसेवक हे आशेवाडी येथे फेब्रुवारी २१ पासून कार्यरत असून आम्ही त्यांना येथे हजर करून घेण्यास विरोध केला होता. मात्र पंचायत समितीने त्यांना हजर करून घेण्यास भाग पाडले .दोन महिने कालावधीत कोणतेही विकासकामे मंजूर नसताना सुरू नसताना ग्रामपंचायतीचे ग्रामनिधीच्या बँक ऑफ बडोदा ढकांबे शाखेतून रु.८८८८२० तसेच १५ व्या वित्त आयोग निधीचयस युनियन बँक दिंडोरी शाखेतून रु. १९२०३८० सरपंच यांची बनावट सही करत तसेच पेसा निधीतून रु.९२०८८९ पेसा सदस्य तथा उपसरपंच व सरपंच यांच्या चेकवर बनावट सह्या करून ग्रामसेवक यांनी त्यांचे जवळच्या मित्रांचे खात्यावर आर्टीजीएस व चेकद्वारे जमा करत हडप केले .१२ एप्रिल रोजी ग्रामसभेत सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या हिशोबाबाबत ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ते फरार झाले. त्यामुळे सरपंच व उपसरपंच यांना संशय आल्याने त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता सदर ग्रामसेवकाने सरपंच उपसरपंच यांच्या बनावट सह्या करून अपहार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी भावसार यांचेकडे तक्रार केली. यानंतर त्यांचेवर कारवाई करण्यात आली .सरपंच उपसरपंच यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक व जिप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही तक्रार केलेली आहे. तरी सदर ग्रामसेवक व त्यांचे साथीदारांवर गुन्हे दाखल करत सदर ग्रामसेवकास बडतर्फ करावे अशी मागणी सरपंच जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच सुनीता संजय बोडके यांनी केली आहे.