दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दारू पिऊन त्रास देतो वेड्यावानी करतो म्हणून बायकोने नवऱ्याचा प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केल्याचा प्रकार दिंडोरी पोलिसांनी उघडकीस आणला असून दोघा आरोपींना अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी दोन जून रोजी नाशिक ते पेठ रस्त्यालगत देहरे वाडी ते रासेगाव रोडवर पिंपळगाव बसवंत येथील अनिल राजाराम झेंडफळे या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत दिंडोरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनेबाबत अधिक तपास केला असता मयत इसमाची पत्नी सुनिता अनिल झेंडफळे हिचे दीपक दत्तू गवे रा. रवळगाव ता दिंडोरी हल्ली मुक्काम पालखेड बंधारा ता. दिंडोरी या इसमाशी सहा वर्षापासून अनैतिक संबंध होते.मयत अनिल झेंडफळे हा आपली पत्नी सुनिता हीस दारू पिऊन त्रास देतो व वेड्यासारखा वागतो म्हणून संगणमत करून त्यास संपविण्याचे ठरवत गवे याने खूनाचा कट रचत प्रेयसीकडून पैसे घेत झेंडफळे यास दारू पाजून दोन जूनच्या रात्री देहरे वाडी खराडी शिवारात घेऊन जात देहरे वाडी ते राशेगाव रस्त्याच्या लगत मयतच्या डोक्यात मागील बाजूस लोखंडी हातोडीने वार करून जीवे ठार मारले. मयताचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रस्त्याच्या कडेला फेकून दिले.याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी मयताच्या पत्नीचे फोनच्या कॉल डिटेलच्या तसेच पिंपळगाव येथील सीसीटिव्ही फुटेजच्या माहितीच्या आधारे खूनाच्या गुन्ह्याची उकल करुन मुख्य आरोपी दीपक गवे यास अटक केली.याबाबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपअधीक्षक सौ माधुरी कांगणे, कळवणचे उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक अजय कौटे, पोलीस नाईक धनंजय शीलावटे, बाळा पानसरे, संदीप कडाळे,युवराज खांडवी यांच्या पथकाने अधिक तपास करीत संशयित आरोपींना गजाआड केले आहे.