दिंडोरी : तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य अभियंता विजय खालकर यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हिएसआय) च्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय उत्कृष्ठ चीफ इंजिनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. व्हिएसआयचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री जेष्ठ नेते शरद पवार यांचे हस्ते नुकताच खालकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम दहा हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय साखर परिषदेत व्हिएसआयने जाहीर केलेल्या विविध पुरस्कारांचे वितरण जेष्ठ नेते शरद पवार यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष तथा कादवा चे अध्यक्ष श्रीराम शेटे व्यासपीठावर उपस्थित होते. विजय खालकर यांनी कादवा साखर कारखाना येथे 1987 साली शिकाऊ इंजिनिअर म्हणून नोकरीस सुरुवात करून,क. का वाघ रानवड, निफाड कारखाना डे. चिफ इंजिनिअर, विघ्नहर साखर कारखाना , विद्युत प्रकल्प को जन इंजिनिअर,व सन 2013-14 पासून, कादवा कारखाना येथे चिफ इंजिनिअर तसेच , काही काळ,प्रभारी कार्यकारी संचालक, म्हणूनही उत्कृष्ट काम केले आहे. कमीत कमी खर्चात व वेळेत कारखान्याचे मशनरी आधुनिकीकरण करून गाळप क्षमता 1650 मे.टन प्रति दिना वरून 2500मे. टन करून यशवी रीत्या गळीत हंगाम पार पाडला. कमीत कमी कामगार संख्येत जादा उत्पादन केल्याने,तसेच विज व स्टीम वापरात बचत केल्याने, मोठ्या प्रमाणात , भुस्सा बचत होवून, कारखान्याचे उत्पंनात वाढ झाली. त्यांचे सलग 3 वर्ष कामाचा आढावा घेऊन त्यांना वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी , राज्य पातळीवरील ” बेस्ट चिफ इंजिनिअर पुरस्कार ” देवून सन्मानित केले आहे.
खालकर यांचे यशाबद्दल कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे,व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते सर्व संचालक मंडळ,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ,आमदार दिलीप बनकर, मवीप्र सरचिटणीस नीलिमा पवार,सदाशिव शेळके,पद्माकर वडजे, शंकरराव गटकळ, पांडुरंग गटकळ, दत्तू उफाडे, अशोकराव पाटील भालेराव तिसगाव, संपतराव कोडं, कादवा कामगार युनियन,आधिकरी , कर्मचारी, अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले .