दिंडोरी – राज्य शासनाच्या महिला व बाल विकास खात्याचे अंतर्गत नाशिक जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्यपदी दिंडोरीचे ॲड.भास्कर उध्दव मोरे यांची नियुक्ती झाली आहे. राज्य शासनाने नुकतीच जिल्हा बाल कल्याण समिती जाहीर केली असून त्यात अध्यक्षपदी मिलिंद बाबर सदस्यपदी गोपाळ शिंपी,भास्कर मोरे,पल्लवी घुले,भगवान एलनामे यांची नियुक्ती केली आहे. मोरे यांनी नाशिक मनपात अभियंता व विविध उच्च पदावर सेवा केली. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सामाजिक कार्यात ते अग्रेसर असून उद्योजक,कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करीत आहेत. त्यांचे नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.