दिंडोरी – दी इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक केंद्राच्यावतीने अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांना दिला जाणारा पुरस्कार कादवा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य अभियंता विजय खालकर यांना महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष (उत्पादन संचालन) के. जी. शेणॉय आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. मैती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नाशिक येथे झालेल्या समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभियंता विजय खालकर यांचेसह विविध अभियंत्यांना सन्मानित करण्यात आले.विजय खालकर हे कादवा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य अभियंता असून कादवा ने १२५० मेटन गाळप क्षमता दुप्पट २५०० मे टन करत आधुनिकीकरण व विस्तारीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले त्यांच्या कामाच्या योगदानाची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ने गतवर्षी दखल घेत त्यांना उत्कृष्ट अभियंता म्हणून पुरस्कार देत गौरविले होते यंदा दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) संस्थेने ही त्यांना पुरस्कार देत सन्मानित केले.या यशाबद्दल खालकर यांचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे, व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते सर्व संचालक अधिकारी कामगार यांनी अभिनंदन केले आहे.