दिंडोरी – ऊस संशोधन व साखर उद्योगास तांत्रिक मार्गदर्शन करणाऱ्या अंतराष्ट्रीय संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक पदी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक नुकतीच होत मतदार संघ क्र.१ मधून कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक तथा निवडणूक समिती अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी केली. शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी श्रीराम शेटे यांचे सहकारी साखर कारखाना उद्योगातील आदर्शवत कामकाज बघून यापूर्वी त्यांची राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व उपाध्यक्षपदी संधी दिली आहे. त्या पाठोपाठ अंतराष्ट्रीय संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यांचे निवडीचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ आदींनी अभिनंदन केले आहे.