दिंडोरी – कादवा कारखान्याचे संचालक मंडळाने मागील काळात संस्थेच्या हितासाठी पारदर्शक काम करत संस्थेचा विकास केला.त्या कामाची पावती सभासदांनी मतदानातून दिली.कादवा सभासदांनी जो विश्वास आपल्यावर टाकला आहे,त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. कारखान्याच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील असे आश्वासन कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले. वलखेड येथे मोरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर्फे कादवा कारखाना नवीन संचालक मंडळाचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी शेटे बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ होते.यावेळी
शेटे म्हणाले की, पुढील काळात विस्तारीकरण कामे पूर्ण करून कारखाना प्रगतीपथावर कसा राहील वेळेत ऊस तोड होईल यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.त्याचप्रमाणे सर्व ऊस तोडला जाणार असून ऊसतोड कुणाचीही शिल्लक राहणार नाही.कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करत ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध राहू याची ग्वाही शेटे यांनी दिली.विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की श्रीराम शेटे यांचे कार्य देशाचे नेते शरद पवार यांना सुद्धा भावते.पवार सुद्धा शेटे यांच्या सहकारातील मार्गदर्शनाचा राज्याला उपयोग होईल असे सांगतात.कादवा सभासदांनी योग्य निर्णय घेतला असून शेटे यांचे संचालक मंडळ कायमच निवडून येत राहील असे झिरवाळ म्हणाले.
नव उद्योजकांना दिंडोरी तालुक्यात होणाऱ्या आद्योगिक वसाहतीत संधी राहणार असून किमान ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ नेते विश्वास देशमुख, नगरसेवक नितीन गांगुर्डे,विठ्ठल संधान,रघुनाथ पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.मोरे कुटुंबीयांनी कारखानदारीच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्याच्या प्रगतीत वाटा उचलला असल्याचे गौरोद्गार शेटे,झिरवाळ यांनी काढले.
श्रीराम शेटे यांचा सत्कार यू.पी. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. नरहरी झिरवाळ यांचा सत्कार भास्कर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.सर्व संचालक मंडळाला मोरे कुटुंबीय व वलखेड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब जाधव ,दिनकर जाधव,नंदू सोमवंशी,बापू पडोल,राजेंद्र गांगुर्डे,विश्वनाथ देशमुख,अशोक बागमार,संजय पडोळ ,रामदास पिंगळ,अमोल भालेराव, नरेश देशमुख,सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन ओरयाझा मिल चे संचालक भास्कर मोरे यांनी केले.आभार प्रणव मोरे यांनी मानले.