दिंडोरी -दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यातील शेती व शहराना कडक उन्हाळ्यात तहान भागविणा-या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशया मध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यांमुळे दिंडोरी तालुक्यातील स्थनिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
करंजवण धरणात चालू वर्षी १०० टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र सलग एक महिन्यापासून आवर्तन चालू असल्यामुंळे सध्या धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. भविष्यातील कडळ उन्हाळ्यांचा विचार करता तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्या मध्ये करंजवण धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून पालखेड धरणात पाणीसाठा केला जातो. यांचा परिणाम त्यांमुळे कादवा नदीचे पाणीपात्र संपूर्णपणे कोरडे पडते. त्यामुळे कादवा नदी काठावरिल पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे जनावरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यांमुळे करंजवण धरणातून एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी वांरवार होत आहे. करंजवण धरणातून एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडल्यास तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईच्या झळा बसणार नाही. मात्र प्रत्येक वर्षी’ उशाला धरण पायथ्याला नदी’ असताना स्थनिक जनतेच्या घशाला उन्हाळ्या मध्ये कायम पाणी टंचाईमुळेधरण घशाला कोरड पडलेली असते. अशा परिस्थिती स्थानिक जनतेच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. वांरवार मागणी करूनही कादवा नदीत पाणी सोडले जात नाही. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष घालण्याची मागणी होत असून करंजवण धरणातून एक महिन्यापासून सोडलेले पाणी बंद करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे .
दिंडोरी तालुक्यातील धरणाचा आजचा पाणीसाठा
करंजवण धरण ३६ टक्के
वाघाड धरण २४ टक्के
पुणेगाव धरण ३५ टक्के
ओझरखेंड धरण ५७ टक्के
पालखेड धरण ६४ टक्के
तिसगाव धरण ४८ टक्के
पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
करंजवण धरणातून एक महिन्यापासून आवर्तन सोडल्यामुळे १०० टक्के भरलेल्या धरणात फक्त ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे भविष्यात स्थनिक जनतेचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातून कादवा नदी पात्रात एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात आले पाहिजे. प्रत्येक वर्षी जेव्हा येवला, मनमाड शहराना तहान लागते तेव्हाच स्थनिक जनतेला मिळते. या धोरणात सुधारणा होऊ एक महिन्याच्या अंतराने धरणातून पाणी सोडण्यात यावे. म्हणजे स्थानिक जनतेला पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही यांची दखल नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी घ्यावी.
जयदिप देशमुख, करंजवण