दिंडोरी – कर्तव्यावर असतांना गांधील माशी चावल्याने दिंडोरी येथील पोलिस यशवंत आनंदा भोये (५२) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोये गार्डची कामगिरी बजावत असतांना त्यांना गांधीलमाशीने चावा घेतल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांच्या सहका-यांना त्यांना खासगी रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. यशवंत भोये यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. दिंडोरी पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.