दिंडोरी – तालुक्याच्या पश्चिम भागात काल सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व तुफान स्वरूपाची गारपीट झाल्यामुळे द्राक्षबागेचे १०० टक्के नुकसान झाले असून कादां, गहू, इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वर्षातून एकदाच उत्पन्न देणारे पिक हातातून गेल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून दिंडोरी तहसिलदार पंकज पवार,उपसरपंच शरद मालसने कृषीसहाय्यक व ग्रामसेवक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करून पंचनामे केले आहे.
सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास वातावरण अचानक बदल घेऊन वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस झाल्यांमुळे निगडोळ, उमराळे खुर्द , चाचडगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे. त्याप्रमाणे म्हेळुस्के, कादवा माळुगी, नळवाडी, निळवंडी, पाडे, मडकीजांब, जांबुटके, उमराळे बुद्रक, हातनोरे, वलखेड या परिसरातहि अवकाळी स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला आहे. तालुक्यातील निगडोंळ, चाचडगाव येथे मोठ्या प्रमाणावर बेमोसमी पाऊस व गारपीट झाल्यांमुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून काही द्राक्षबागा भूईसपाट झाल्या असून कादां, गहू,भाजीपाला आदी पिकांचे ही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. वर्षभर कष्ट करून फुलविलेल्या द्राक्षबागा काही क्षणात धुळीस मिळाल्या आहे. त्यांमुळे नुकसानग्रस्त कुटूंबापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. निगडोंळ येथील द्राक्ष उत्पादक बबनराव मालसाने , योगेश मालसाने ,राजू मालसाने,दौलत मालसाने, भाऊसाहेब मालसाने, तुकाराम मालसाने, शिवाजी मालसाने, केशव मालसाने, निवृती मालसाने, दिपक मालसाने, तुकाराम मालसाने, अनिल मालसाने, चाचडगाव येथील रामचंद्र पेलमहाले आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
निगडोळ येथील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती तलाठी वाघ यांना दिल्यानंतर ही त्यांनी गावात कोणतीही पाहणी केली नाही. मात्र तहसीलदार स्वतः पाहणी करत होते अशा बेजबाबदार तलाठ्यावर तात्काळ कार्यवाही करून झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. शरद मालसाने उपसरपंच निगडोळ, तहसीलदार बांधावर तलाठी सुट्टीवर दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी गारपीट झाली. निगडोळ येथील तलाठी यांना कळविले मात्र तरीही ते आज सुट्टीवर गावी गेले. मात्र तहसीलदार पंकज पवार यांनी तत्परता दाखवत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत पंचनामे केले शेतकऱ्यांना धीर दिला. तर इतर ठिकाणच्या एक तलाठी यांनी अमुक मिमी पाऊस झाला तरच पंचनामे होतात व पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाचे असल्याचे सांगितले. तलाठी यांच्या बेफिकिरी बद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.