दिंडोरी : तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना रुग्णांची आजच्या परिस्थिती लक्षात घेता ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही तसेच वणी व दिंडोरी येथे ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारूनही ऑक्सिजन बेड कमी पडत आहे यासाठी बोपेगाव येथे नवीन ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारण्याच्या हालचालीस वेग आला असून या संदर्भात दिंडोरीच्या पूर्वभागात जऊळके वणी व कादवा कारखाना येथे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या असून पुढील नियोजन करण्यात असल्याची माहिती जऊळके वणी येथील सरपंच योगेश दवंगे यांनी दिली आहे.
प्रथम जऊळके वणी येथे कोविड सेंटर चालू करण्याची चर्चा चालू होती सरपंच वंसत कावळे यांनी सर्व सोयीयुक्त बोपेगाव योग्य असल्याची भूमिका मांडली व दुसऱ्या दिवशी कादवा कारखाना येथे श्रीराम शेटे यांच्या उपस्थिती मध्ये जी बैठक झाली या बैठकीत सर्वमताने बोपेगाव येथे ऑक्सिजन बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्यासाठी एकमत झाले असून अनेक तज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे भविष्यात ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे या पूर्वभागातील अनेक गावातील सरपंच,उपसरपंच एकत्र येवून प्रत्येक गावातून लोकवर्गणी करून बोपेगाव येथे तीस ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व पक्षीय नेत्यांसह कार्यकर्ते एकत्र आले आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्व शासकीय व खाजगी कोविड सेंटर फुल झाले आहे. बहुसंख्य पॉझिटीव्ह रुग्णांना जागा उपलब्ध होत नाही अनेक रुग्ण घरातच उपचार घेत आहेत त्याप्रमाणे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण डॉक्टरच्या सल्ल्याने घरात उपचार घेताना दिसत आहे आशा कठिण परिस्थितीमध्ये पक्षीय भेद विसरून काम करण्याचे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले आहे.
त्याप्रमाणे दिंडोरीच्या पश्चिम भागातील जनतेचा विचार करता ननाशी येथेही कोविड सेंटरची आवश्यकता आहे यासाठी लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारण्यासाठी चर्चा चालू असल्याची माहिती कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली आहे. बोपेगाव येथील कोविड सेंटर संदर्भात लवकरच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ त्याचप्रमाणे दिंडोरी व पेठेचे प्रांतअधिकारी डॉ. संदिप आहेर,तहसीलदार पंकज पवार यांच्याशी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी कादवाचे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे , शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, जि.प सदस्य भास्कर भगरे सुरेशभाऊ डोखळे,पांडुरंग गणोरे ,वसंत कावळे, डॉक्टर योगेश गोसावी, गंगाधर निखाडे,योगेश दवंगे,पोलिस पाटील राजेंद्र पाटील,अतुल वाघ ,माधव दादा उगले, वसंत रामभाऊ जाधव, प्रभाकर जाधव, रावसाहेब संधान, सुनिल मातेरे,संतोष पाटील,अमित भालेराव,नितीन भालेराव, प्रताप देशमुख, सागर गटकळ,आदींसह पूर्व भागातील असंख्य गावातील सरपंच उपसरपंच या बैठकीला उपस्थित होते.