शासकीय निधीचा योग्य तऱ्हेने नियोजन केल्यास करंजवण गांवा सारखा इतर गांवाचाही विकास शक्य –विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन
दिंडोरी : ग्रामस्थांच्या मदतीने विविध निधीचा योग्य तऱ्हेने पारदर्शक नियोजन करून तालुक्यातील पश्चिम भागातील करंजवण ग्रामपंचायतीने कोणते स्वनिधीचे उत्पन्न नसतांना ग्रामपंचायत इमारतींचे भव्य नाविन्यपूर्ण बांधकाम, इतर विकास कामे व विविध उपक्रमांचा इतर ग्रामपंचायतीनीही आदर्श घेवुन शासकीय निधीचे योग्य तऱ्हेने नियोजन केल्यास ग्रामविकासाला चालना मिळेल. असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले
तालुक्यातील करंजवन येथील ग्रामपंचायत इमारत, व्यापारी संकुल,व्यायाम शाळा, इमारतीचे उदघाटन करण्यात आले. तसेच राजवाडा येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती सुधार योजनेतून उंच पाण्याची टाकी, गावातील अंतर्गत कॅाकीट रस्ते ५०० मीटर या विकासकामांचाही शुभारंभ विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कादवा सह साखर कारखाण्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सभापती कामिनी चारोस्कर, उपसभापती वनिता आपसुंदे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी नरहरी झिरवाळ बोलत होते. पुढे त्यांनी सांगितले की, विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी साधून माझे मतदार संघात जास्तीत जास्त गाव जोडणी रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्याच्या विकासाकरीता मनमाड ते गुजरात (धरमपुर) हायवे रस्ता करिता शासणाकडे पाठपुरावा करून मंजुरीसाठी चालना देण्यात येईल. करंजवन येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्याकरिता इमारत निधी करता पाठपुरावा करण्यात येईल. त्या अगोदर ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये कर्मचारी वर्गाची मंजुरी घेऊन प्राथमीक आरोग्य केंद्र लवकरच सुरू करण्यात येईल. ग्रामपंचायतीला १५ वित्त आयोगाचा विकासासाठी निधी मिळत असतो.परंतु त्याच निधीतून ऑपरेटरच्या खर्च केला जातो. याशिवाय दोनच दिवसापूर्वी पाणी पुरवठा योजनांचे थकीत बिले हे १५ वित्त आयोग मधून खर्च करण्याचे आदेश निघाला आहे. यामुळे गांव पातळीवर विकास कामांना निधी शिल्लक राहणार नाही. त्याबाबतही मी शासनाकडे लवकरच पाठपुरावा करणार असल्याचे नरहरी झिरवाळ यांनी संगीतले.
यावेळी कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी सांगितले की पूर्वीच्या परिस्थितीच्या मानाने आत्ताचे परिस्थितीत करंजवन ग्रामपंचायतीने उत्पन्न नसतांनाही अत्यंत बारकाईने नियोजन करून ग्रामस्थांच्या मदतीने विकासाकडे सुरू केलेली वाटचाल ही खरोखरच स्तुत्य आहे. येथील विविध उपक्रम नाविण्यपूर्ण असून या गावाचा आदर्श इतर ग्रामपंचायतीने घेण्या सारखा आहे. असे सांगितले. दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धरणे आहेत,परंतु तालुक्यातील बरेचसे शेतकरी पाणी आरक्षणाचा फॉर्म व नाममात्र रक्कम भरून पाणी आरक्षण करत नाही. त्यामुळे आपल्या हक्काचे पाणी आरक्षित करता येत नाही. याकरिता भविष्यातील समस्या विचारात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने पाणी आरक्षण करून ठेवणे गरजेचे आहे. असे कादवा चे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
याबाबत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले की माझे कार्यकाळात करंजवण ग्रामपंचायतीसाठी दहा लाख रुपये निधी दिला. त्याचा ग्रामपंचायतीने योग्य तऱ्हेने विनीयोग करून उत्कृष्ट इमारत बांधकाम केल्याने माझ्या स्मरणात राहील. याच पद्धतीने प्रत्येक ग्रामपंचायतीने शासकीय निधीचा वापर केल्यास करंजवण सारखे आदर्श ग्रामपंचायती निर्माण होऊ शकतील. सभापती कामिनी चारोस्कर यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट विकास कामे, भूमिगत गटारी, वृक्षलागवड, विविध विकासाचे उपक्रम हे खरोखर स्मरणात राहील. असेच कार्य ग्रामपंचायत करंजवणचे आहे. यामुळे मी पूर्णपणे भारावून गेली आहे. याच पद्धतीने इतर गावांनीही करंजवण गावाचा आदर्श घेऊन विकासाकडे वाटचाल करावी. असे आवाहन कामिनी चारोस्कर यांनी केले.
यावेळी कादवाचे संचालक संपतराव कोंड यांनी सांगितले की, गांवात सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी हे कार्यक्षम असले तर गांवाचा विकास निश्चीत होतो, हे करंजवण गांव अनुभवत आहे. यावेळी खेडगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य भास्करराव भाकरे, उप अभियंता संजीव पवार, शाखा अभियंता आर के पवार , वि. अ. संजीवनी चौधरी, योगेश गोसावी, राष्ट्रवादीचे युवा नेते श्याम हिरे, गणेश शार्दूल, ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, मेळुस्केचे उपसरपंच योगेश बर्डे, शंकर चारोस्कर, विठ्ठलराव अपसुंदे, प्रशांत जमदाडे, दीपक झिरवाळ, सतीश वाळके, दीपक धुमणे,पंकज उफाडे , आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात ग्राम विकास अधिकारी अरुण आहेर यांनी विकास कामांबाबत माहिती दिली. यावेळी सरपंच रेखा मोरे, सदस्य प्रतिभा मोरे, माजी उपसरपंच सुरेश कोंड,रमेश देशमुख, दशरथ कोंड,दगडू खराटे, विठ्ठल गांगुर्डे, दशरथ कोंड ,भास्कर देशमुख, रंगनाथ बर्डे,, प्रकाश देशमु्ख, भारत देशमुख, नानासाहेब देशमुख, बाळू देशमुख, अरूण देशमुख, दिलीप बर्डे,गणेश शार्दूल, विलास सुक्रामदास बैरागी, यशवंत शार्दूल, विलास जाधव, सुभाष जाधव, भाउसाहेब कोंड, बाजीराव शार्दूल, संदीप गांगोडे. रामभाउ बर्डे, विलास बर्डे, काशीनाथ भालेराव, विजय देशमुख, बाळासाहेब बर्डे, रविंद्र बर्डे, दत्तु वासले, तुकाराम खराटे, अशोक खराटे, बाबु गांगोडे, मंगळु खराटे, रविंद्र मोरे, भास्कर पिंगळे, नामदेव कोरडे, संजय बर्डे, संपत भालेराव, आदि नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.