नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर शिवारात भक्षाचा पाठलाग करताना कठडा नसलेल्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. शेतकरी जयराम गवळी यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या पडल्याच लक्षात येताच गवळी यांनी याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला सुखरुप बाहेर काढले. पिंज-यात जेरबंद झालेल्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहे.