दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील करंजवण धरणात आज दुपारी युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. साई संदिप मोरे (वय 16, रा. करंजवण) असे मृत युवकाचे नाव आहे. साई हा धरणात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला. स्थनिक नागरिकांच्या मदतीने सुमारे अडीच तासाने साईचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
जेव्हा साई धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतारला तेव्हा आजूबाजूला अनेक ठिकाणचे युवक पोहण्यासाठी आले होते. त्यांमुळे साई पाण्यात बुडूत आहे असे समजले नाही. कदाचित समजण्यास उशीर झाला असता. साईने यंदा इयत्ता 10 वीची परिक्षा दिली होती. या घटनेमुळे करंजवणसह आजूबाजूच्या गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.