इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिंडोरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुनीता चारोस्कर यांनी माकपने पाठींबा दिल्यामुळे त्याचा फायदा त्यांना होणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणुकी राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी असली तरी या निवडणुकीचे गणित यावेळेस वेगळे राहणार आहे.
या मतदार संघात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाने चारोस्कर यांना पाठींबा आहे. त्यात माकपने महाविकास आघाडी बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदार संघाच्या शेजारी असलेल्या कळवण – सुरगाणा येथे माकपचे जीवा पांडू गावित रिंगणात आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार करत असतांना माकपने दिंडोरीवरही लक्ष केंद्रीत केले आहे.
चारोस्कर साठी डॅा. डी.एल. कराड व माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी जोरदार प्रचार केला आहे. या मतदार संघात त्यांची मोठे समर्थक असून त्याचा फायदा चारोस्कर यांना होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या मतदार संघात सभा घेऊन चारोस्कर यांच्यासाठी प्रचार केला. त्यानंतर येथे चांगलीच चुरस तयार झाली आहे.