दिंडोरी : तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या व निफाड येवला मनमाड तालुक्याला पाणी पुरवठा करणा-या करंजवण धरणातून गेल्या ३० दिवसापासून पाणी सोडण्यात आले असून सध्या धरणामध्ये २१ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. स्थानिक दिंडोरी तालुक्यातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा विचार करून भविष्यातील येणारे पाणी टंचाई लक्षात घेता लाबलेले आर्वतन बंद करण्यात यावे आशी मागणी करंजवण, ओझे, खेडले, म्हैळूस्के, लखमापूर, नळवाडी, जोरण, पिंपळगाव धुम,नळवाडपाडा, चारोसे आदी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
चालू वर्षी दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे करंजवण धरण ९३ टक्के भरले होते त्यांमुळे चालू वर्षी कादवा नदीला पुराचे पाणी आले नाही. त्यातुलनेत निफाड येवला मनमाड या परिसरात दर वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस पडला होता. मात्र या तालुक्याचे करंजवण धरणातील पाण्यावर आरक्षण असल्यामुळे पाणी त्यांना पाणी सोडावेच लागते. दिडारी तालुक्यातील कादवा नदी काटावरिल पाणी पुरवठा योजना व स्थनिक शेतकरी वर्गाचा विचार करता करंजवण धरणातील हे आवर्तन बंद करून पुन्हा टप्पा टप्पाने सोडण्यात यावे. अशी मागणी कादवा नदी परिसर व करंजवण धरण क्षेत्रतील गावामधून होते आहे.
करंजवण धरण क्षेत्रात मागील वर्ष १२४४ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. त्यांमुळे ऑगस्ट महिन्यामध्येच करंजवण धरण १०० टक्के भरले होते. त्या तुलनेत या वर्षी करंजवण धरण क्षेत्रात फ्कत ८९० मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी करंजवण धरण क्षेत्रात ३५४ मिलीमीटर इतका कमी पाऊस पडला आहे. मागील वर्षी दिडोरी तालुक्यात १६८६.१ मिलीमिटर इतका पाऊस पडला होता. तर चालू वर्षी तालुक्यात ९११.४५ मिलीमिटर इतका पाऊस पडला आहे. म्हणजे दिंडोरी तालुक्यात मागील चार वर्षाच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडला आहे. त्यांमुळे पश्चिम भागातील नदी-नाल्यांना पूर आलाच नाही. त्यांमुळे पाऊस लांबल्यास तालुकयात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. यासाठी जलसंपदा विभागाने करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन त्वरित बंद करू महिन्याच्या टप्या टप्पा सोडण्यात यावे आशी मागणी होत आहे
दोन दिवसात करंजवण धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यात येणार आहे.
दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातून ३० दिवसापासून सोडलेले पाणी येत्या दोन दिवसात बंद होणार आहे. पुढील दोन महिन्याचा विचार करता तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. या संदर्भात संबधीत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व पाटबंधारे विभाग यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांमुळे येत्या दोन दिवसात करंजवण धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यात येणार आहे.
श्री नरहरी झिरवाळ
प्रभारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभा.