नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीच्या तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी कमरुद्दिन गुलाम अहमद सैयद हा १० हजाराची लाच घेताना सापडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत तो रंगेहाथ सापडला आहे. एसीबीने आवाहन केले आहे की, शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 यावर संपर्क साधावा. यासंदर्भात एसीबीने दिलेली माहिती अशी
आरोपी- श्री. कमरुद्दिन गुलाम अहमद सैयद ,वय 43 वर्ष, मंडळ अधिकारी, तहसिल कार्यालय, दिंडोरी जि. नाशिक.
लाचेची मागणी रक्कम- 10,000/- रुपये.
लाचेची मागणी तारीख – दिनांक 25/08/2022.
लाच स्विकारली – तारीख दिनांक 25/08/2022.
लाच मागणीचे कारण -. तक्रारदार यांचे शेतजमिनीचे 7/12 उताऱ्यावर मा. न्यायालयाचे आदेशानुसार त्याचे मावशीचे नाव समाविष्ट करणे करिता आलोसे यांनी रू.10,000/- लाचेची पंचासमक्ष मागणी करून रू.10,000/- लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dindori Circle Officer Bribe Trap ACB
Nashik Crime