नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मस्सोजगाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप असलेले विष्णू चाटे व वाल्मिक कराड हे दिंडोरीतील आश्रमात मुक्कामाला होते असा दावा भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी आश्रमाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे उर्फ गुरुमाऊली यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर आता आण्णEसाहेब मोरे यांचे चिरंजीव आबासाहेब मोरे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
देसाई यांनी सांगितलेल्या कालावधीत येथे दत्तजयंती सप्ताह सुरु होता. या काळात येथे लाखो भाविक येतात. ते गर्दीत दर्शनाला येवून गेले. मात्र आम्हाला याची कल्पना नाही. सीआयडी टीम येथे येऊन गेली. आम्ही त्यांना आश्रमातील सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. ते भाविक म्हणून येवून गेले, मात्र आम्हाला त्याची माहिती नाही. मात्र त्यांना व्हिआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप खोटा आहे. येथे दरबारात मुक्कामाची व्यवस्था नाही.
यावेळी त्यांनी तृ्प्ती देसाई यांनी गुरुमाऊलींवर लैंगिक शोषणाचे आरोप केले त्याचेही खंडण त्यांनी केले. हे मंदिर आहे. येथे आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो, मागे काही वर्षापूर्वी एका सेवेकरी व्यक्तीच्या बाबतीत आरोप करण्यात आले. मात्र नंतर तक्रारकर्ते हायकोर्टात खोटे ठरले. त्यांनी माफी देखील मागितली. त्यामुळे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे आबासाहेब मोरे यांनी स्पष्ट केले.