बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौकशी समितीने ठेवला हा ठपका…या नियमाचा केला भंग

by India Darpan
एप्रिल 7, 2025 | 8:11 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Screenshot 20250404 152129 Facebook 1


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकूळ असताना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये नेले होते. पण, अगोदर १० लाख रुपये भरावे, त्यानंतरच दाखल केले जाईल असा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे महिलेला दुस-या रुग्णालयात उपचारासाठी प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, येथे दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता राज्य शासनाने नेमलेल्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला असून त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. रुग्णला दाखल करुन न घेता अनामत रक्कम मागण्याचा प्रकार नर्सिंग होम अॅक्टमधील चुकीचा असल्याचे अहवालात स्पष्ट म्हटले आहे.

या पाच सदस्यीय चौकशी समितीत पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॅा. राधाकृष्ण पवार, सहायक संचालक डॅा. प्रशांत वाडीकर, जिल्हा शल्यचिकित्यसक डॅा. नागनाथ यम्मल्ले, पुणे मनपाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॅा. निना बोराडे, आरोग्य सेवा पुणे मंडळाच्या स्त्रीरोग तज्ञ वैदकिय अधिकारी डॅा. कल्पना कांबळे यांचा समावेश होता. या समितीने शासनाला सादर केल्या अहवालात रुग्णाला तत्काळ दाखल करुन घेतले नाही ही चूक असल्याचे म्हटले आहे.

नर्सिंग होम अॅक्टमधील नियमानुसार डिपॅाझिट रक्कम मागता येत नाही. यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचे समितीने म्हटले आहे. संबधित महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करुन न घेणे ही रुग्णालयाची मोठी चूक आहे असा ठपका चौकशी समितीने आरोग्य विभागाला सादर केलेल्या अहवालात केला आहे.

रुग्णालयाच्या तज्ञांच्या समितीने दिली होती क्लीन चीट
या अगोदर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली व त्यांचा तीन पानाचा अहवालही समोर आला आहे. या समितीत वैद्यकिय संचालक डॅा. धनंजय केळकर, डॅा. अनुजा जोशी, डॅा. समीर जोग (अतिदक्षता विभाग प्रमुख), सचिन व्यवहारे (प्रशासक) यांचा सहभाग होता. त्यात रुग्णलयाची कोणतीही चूक नसल्याचे म्हटले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांची जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट…दिल्या या सूचना

Next Post

धक्कादायक…पतीने पत्नी व सासूला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न…सिन्नर तालुक्यातील घटना

Next Post
fire 1

धक्कादायक…पतीने पत्नी व सासूला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न…सिन्नर तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011